
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधते.नुकतंच तिने इंस्टाग्रामवरून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने आपल्याला प्रश्न विचारण्यास सांगितलं. तेव्हा तिला चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाची भलतीच चर्चा झाली.

एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं की "Have you reproduced because I wanna reproduce you" यावर समांथाने जे उत्तर दिलं त्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

समंथाने यानेटकऱ्याला म्हणाली की "reproduce शब्द कसा लिहायचा त्यासाठी गुगल कर." नेमक्या आणि परखड शब्दात समांथाने दिलेलं उत्तर अनेकांच्या पसंतीस उतरलं. तिचं हे उत्तर सध्या चर्चेत आहे.

समंथाच्या शाकुंतलम चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. यामध्ये ती एका वेगळ्या लूकमध्ये दिसतेय.

समंथाच्या नुकत्याच आलेल्या 'पुष्पा' या चित्रपटाने धुमाकूळ घातला. या चित्रपटातल्या समांथाच्या कामाचं कौतुक झालं.