
अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांचा टाईम प्लीज हा सिनेमा आठवतो का? 2013 ला आलेल्या या सिनेमात झळकलेल्या या चिमुकलीला ओळखलंत का?

उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्यासोबत एका सीनमध्ये ही चिमुकली दिसली होती. ही चिमुकली आता मराठी मालिका जगतातील प्रसिद्ध चेहरा आहे. एका मालिकेत ती सध्या दिसते आहे.

टाईम प्लीज सिनेमातील चिमुकली म्हणजे अभिनेत्री गिरीजा प्रभू.... गिरीजा आता स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत दिसते आहे. 'गौरी' ही तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

टाईम प्लीज सिनेमात मी एका सिनमध्ये मी दिसले आहे. उमेश कामतच्या शेजारी क्रिकेट खेळत असलेल्या मुलांमध्ये मी एकटीच मुलगी आहे. तेव्हा मला काहीही कळत नव्हतं. दिग्दर्शकांनी सांगितलं तसं मी करत होते, असं गिरीजाने एका मुलाखतीत सांगितलं.

गिरीजा प्रभू ही तिच्या अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे साडे चार लाख फॉलोव्हर्स आहेत. नेटकरी तिच्या पोस्टला पसंती देत असतात.