
अभिनेत्री तारा सुतारिया ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. तारा सुतारिया आणि आदर जैन यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

यामध्ये तारा सुतारिया हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे फोटो स्वत: तारा सुतारिया हिने शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तारा सुतारिया ही कॅंडिल लाइट डिनरला गेल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये ताराचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.

आदर जैनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तारा नेमकी कोणासोबत कॅंडिल लाइट डिनरला गेली हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तारा कोणाला डेट करत आहेस? हा प्रश्न चाहते विचारत आहेत.

या फोटोमध्ये ताराचा ग्लॅमरस लूक दिसत असून तारा सुतारिया आनंदी असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये फक्त तारा सुतारियाच दिसत आहे.