
भोजपुरी क्वीन मोनालिसा आपल्या स्टाईलची जादू चाहत्यांवर चालवत असते. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.

बिकिनीपासून ते साडीपर्यंत मोनालिसा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत रॉकिंग अंदाज दाखवते.

नुकतंच, तिने लाल साडी परिधान केलेले तिचे काही देसी स्टाईलचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मोनालिसा खूप सुंदर दिसत आहे, फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.

फोटो शेअर करत मोनालिसानं लिहिलं आहे की, लाल रंग गरम प्रेमींचं रूप आहे. तिचे हे फोटो चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.

बिग बॉसनं तिच्या कारकिर्दीला एक नवं वळण दिलं आहे. बिग बॉसपासून मोनालिसाला चांगलं फेम मिळालं आहे.