
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय टीव्हीची सर्वात ग्लॅमरस आणि सुंदर अभिनेत्री आहे. मौनीच्या सौंदर्यचे लाखो चाहते सुद्धा आहेत.

मात्र तुम्हाला माहिती आहे का की मौनी सारखी दिसणारी एक व्यक्ती आहे. ती दुसरी कोणी नसून टीव्ही अभिनेत्री कृष्णा मुखर्जी आहे.

जर तुम्ही दोघींचे फोटो पाहिले तर तुम्ही गोंधळात पडाल. दोघीही बंगाली कुटुंबातील असून त्यांचे डोळेही खूप सुंदर आहेत.

पूर्वी मौनीनं टीव्हीवर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता कृष्णानं या इंडस्ट्रीत प्रवेश केला आहे.

मौनी आता चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवत आहे, तर कृष्णा 'कुछ तो है: नागीन' या शोमध्ये नवीन रंगात काम करत आहे.