
मोठ्या वादानंतर अखेर द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे द केरळ स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त असा प्रतिसाद देखील मिळालाय. या चित्रपटाबद्दल क्रेझ बघायला मिळत आहे.

नुकताच मध्य प्रदेशच्या सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेत द केरळ स्टोरी हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. आता मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रामध्येही द केरळ स्टोरी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली जात आहे.

नाशिकमध्ये हिंदू सकल समाजाने द केरळ स्टोरी हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करण्याची मागणी केलीये. आता यावर राज्यातील सरकार काय निर्णय घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.


द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. द केरळ स्टोरी चित्रपट रिलीज झाल्यानंतर बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे.