
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका पंधरा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शोमधील अनेक कलाकार हे मालिकेला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. जेनिफर मिस्त्रीसह अनेकांनी मालिका सोडलीये.

तारक मेहता का उल्टा चश्मा मलिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्थात जेनिफर मिस्त्री बंसिवालने मालिकेचे निर्मात असित कुमार मोदीवर गंभीर आरोप केलाय. लैंगिक शोषणाचा थेट आरोप तिने केलाय.

काही दिवसांपूर्वीच मालिकेत टप्पूची भूमिका साकरणाऱ्या राज अनडकट देखील मालिका सोडलीये. मात्र, मालिका सोडण्याचे कारण राज याने कधीच सांगितले नाही. मालिकेमधून कलाकार सतत एक्झिट करताना दिसत आहेत.

तारक मेहता अर्थात शैलेश लोढा यांनीही तारक मेहता मालिका सोडली आहे. शैलेश लोढाने मालिका सोडल्यानंतर असित कुमार मोदीवर अत्यंत गंभीर आरोप देखील केले. असित मोदी विरोधात थेट कोर्टात धाव देखील घेतली.

अंजली तारक मेहता अर्थात नेहा मेहता हिने देखील मालिका सोडलीये. नेहा मेहता हिने देखील कधीच तारक मेहता मालिका सोडण्याचे कारण सांगितले नाही. कोरोना काळातच मालिकेला सोडचिठ्ठी दिली.

गुरुचरण सिंह अर्थात रोशन सिंह सोढी यानेही मालिकेला काही वर्षांपूर्वी निरोप दिला. गुरुचरण सिंह याने देखील मालिका सोडण्याचे कारण सांगितले नाही. मालिकेच्या सुरूवातीपासूनच गुरुचरण सिंहसोबत होता.

आत्माराम तुकाराम भिडेच्या मुलीची मालिकेत भूमिका साकारणारी आणि सर्वांची आवडती झील मेहताने हिने देखील काही वर्षांपूर्वीच मालिका सोडली आहे. चार वर्ष ती मालिकेत काम करत होती.

झील मेहता हिने तारक मेहता मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी निधी भानुशाली ही सोनूचे पात्र साकारत होती. मात्र, तिने विदेशात शिक्षणासाठी जायचे कारण ते मालिकेमधून कायमची एक्झिट घेतली.

भव्य गांधी हा फार वर्ष तारक मेहता मालिकेसोबत जोडलेला होता. छोट्या टप्पूची भूमिका साकारताना भव्य गांधी हा दिसला. मात्र, त्याने देखील अभ्यासाचे कारण देत मालिकेला निरोप दिला.

मोनिका भदोरिया ही देखील बरेच वर्ष बावरीची भूमिका साकारत होती. मात्र, मोनिका भदोरिया हिने देखील प्रेक्षकांना मोठा धक्का देत मालिकेला रामराम केला.

दयाबेन अर्थात दिशा वकानी ही देखील बऱ्याच वर्षांपासून मालिकेपासून दूर आहे. दयाबेनची वाट सातत्याने प्रेक्षक बघताना दिसत आहेत. मात्र, दयाबेन मालिकेत कधी दिसणार यावर निर्मात्याकडे देखील उत्तर नाहीये.