
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड हे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. सतत नेपोटिझमचे आरोप हे बाॅलिवूडवर केले जातात. नेपोटिझममुळेच एखाद्या चांगला अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळत नाही, असा आरोप सातत्याने केला जातो.

आता एका मोठ्या अभिनेत्याने बाॅलिवूडमध्ये कशाप्रकारे भेदभाव केला जातो. यावर भाष्य केले आहे. विशेष म्हणजे आपल्यावर कायमच अन्याय झाल्याचे देखील सांगताना हा अभिनेता दिसला. बॉलिवूडमध्ये आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचे देखील राहुव देव म्हणाला.

अभिनेता राहुल देव याने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत. आता सारा अली खान हिच्या गॅसलाइट या चित्रपटात सुध्दा राहुल देवची झलक बघायला मिळाली.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राहुल देव म्हणाला की, माझ्या अभिनयाला न्याय मिळाला नाहीये. मला चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करायला मिळतात. मात्र, मी त्यापेक्षा अधिका चांगले करू शकतो.

चांगल्या भूमिका करण्यासाठी पात्र असताना देखील कशाप्रकारे आपल्याला ती संधी दिली गेली नाही. यावर बोलताना राहुल देव दिसला. आतापर्यंतच्या करिअरमध्ये राहुल देवने दमदार भूमिका केल्या आहेत.