
पलक एका मुलाखतीत म्हणाली होती, 'माझ्या आईचं नाव खराब होईल असं मी काहीही करणार नाही... जेव्हा मी लहान होती तेव्हा आई मला कुरुप करण्यासाठी माझे केस कापायची... म्हणजे मी कोणाला डेट करु शकणार नाही...

श्वेता लेकीच्या लग्नापर्यंत बोलली होती, 'पलक हिला लग्नाबद्दल एक सल्ला दिला आहे. फक्त कोणाला डेट करत आहेस म्हणून लग्न करणार असशील तर... असं करू नको. पलकने लग्न करु नये असं मला वाटतं...' असं देखील अभिनेत्री म्हणाली.

श्वेता म्हणाली, 'हे पलकचं आयुष्य आहे... तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण पलकने लग्न करण्याआधी विचार करावा असं मला वाटतं...'

'माझ्यासोबत झालेले अत्याचार पलक हिने पाहिले आहेत. त्यामुळे ती कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही...' असं देखील श्वेता म्हणाली होती.

श्वेताची लेक हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर पलक गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे.