
‘रामायण’ फेम दीपिका चिखलिया यांनी 'सुन मेरी लैला', 'रुपये दस करोड' यांसारख्या अनेक कन्नड, मल्याळम, तामिळ आणि बंगाली सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

पण दीपिका चिखलिया यांना 'रामायण' मालिकेच्या माध्यमातून लोकप्रियता मिळाली. आज देखील चाहते त्यांना देवी सीता यांचा मान देतात. आजही चाहते त्यांच्या भूमिकेला विसरु शकले नाहीत.

दीपिका त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. 1991 मध्ये दीपिका यांनी कॉस्मेटिक कंपनीचे मालक हेमंत टोपीवाला यांच्यासोबत केलं. नुकताच पतीसोबत व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे दीपिका चिखलिया वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या..

दीपिका अभिनयासोबतच राजकारणात देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर दीपिका कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

दीपिका आता अभिनयापासून दूर असून कॉस्मेटिक कंपनी सांभाळत आहेत. ‘रामायण’ मालिकेत ‘सीता’ या भूमिकेला न्याय दिल्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या आज देखील फार मोठी आहे.