
उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. अनेकदा लोक उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे टिका करतात. इतकेच नाहीतर कपड्यामुळे अनेकदा उर्फी जावेद हिला थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जातात.

अत्यंत कमी कालावधीमध्ये उर्फी जावेद हिने एक ओळख निर्माण केलीये. मात्र, तिच्या स्टाईलमुळे उर्फी जावेद हिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. इतकेच नाहीतर तिला चक्क राहण्यासाठी कोणी घरही देत नाहीये.

उर्फी जावेद म्हणाली की, मला मुंबईमध्ये राहण्यासाठी एक चांगले घर मिळत नाहीये. मी सध्या 1 बीचकेमध्ये राहत आहे. मला थोडे मोठे घर हवे आहे. मात्र, मला मुंबईमध्ये घर मिळत नाहीये.

उर्फी जावेद म्हणाली, घर मालकाला किंवा सोसायटीमधील लोकांना घरी मुले आलेली चालत नाहीत. माझ्या कपड्यांमुळे लोक मला घर देत नाहीत. तसेच अनेकांना नाॅनव्हेज चालत नाहीत.

मी एक सिंगल मुलगी असल्यानेही मला घर मिळत नाहीये. मला हिंदू लोक घर देत नाहीत आणि मुस्लीम लोकांना माझ्या कपड्यांची समस्या आहे. म्हणजेच मुंबईसारख्या इतक्या मोठ्या शहरामध्ये उर्फी जावेद हिला घर मिळत नाहीये.