
मुंबई : सध्या बॉलिवूडचा अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाची एकच चर्चा आहे. या दोन्ही सेलिब्रिटींचे लग्न येत्या 9 डिसेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात नेमके कसे पडले असे विचारले जात आहे.

कतरिना आणि विकी कौशल लग्नाच्या बेडीत अडकतील असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र आता ते लवकरच लग्न करणार आहेत. या दोघांची प्रेमकहाणी एका चॅट शोपासून सुरु झाली होती. या चॅट शोमध्ये विकी कौशल आणि करण जोहर पाहुणे म्हणून आले होते.

या चॅटशोमध्ये करणने विकीसमोर हा विषय छेडला होता. कतरिनाला तुझ्यासोबत काम करायचे आहे. तशी इच्छा तिने व्यक्त केलेली आहे. आम्ही दोघे पडद्यावर चांगले दिसू असं कतरिनाने सांगितले होते, असे करणने विकीला सांगितले होते. यामुळे विकी कौशल चांगलाच खूश झाला होता.

तसेच कतरिना आणि विकी कौशल एका मुलाखतीमध्ये सोबत दिसले होते. लॉकडाऊनच्या काळात विकी कौशल कतरिनाच्या घरी जाताना दिसलेला आहे. तसेच ते अनेक पार्ट्यांमध्येसुद्धा एकत्र दिसलेले आहेत.

विकी कौशलने एका कार्यक्रमात कतरिनाला प्रपोजदेखील केले होते. त्याने तुम्ही विकी कौशलसारख्या चांगल्या मुलाला शोधून त्याच्यासोबत लग्न का करत नाही ? मला वाटतंय की तशी तुमची इच्छा आहे; म्हणून मी तुम्हाला विचारलं, असं विकी कौशल मस्करीमध्ये कतरिनाला म्हणाला होता. या दोघांनी आपल्या नात्याला उघडपणे कधी स्वीकारलेलं नाही. मात्र आता ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत