Photo : ‘तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं….’ फादर्स डे निमित्त नेहा खानची मनाला भिडणारी पोस्ट

देवमाणुस या मालितून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असलेली अभिनेत्री नेहा खाननं इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (‘Wanted to say thank you….’ Neha Khan's heartbreaking post on Father's Day)

| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 6:22 PM
1 / 5
आज फादर्स डेनिमित्त सर्वच जण सोशल मीडियावर आपल्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर करत आहेत. अशात तुमचे लाडके कलाकारही मागे नाहीत.

2 / 5
देवमाणुस या मालितून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असलेली अभिनेत्री नेहा खाननं इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये तिनं वडिलांसोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
अभिनेत्री नेहा खानचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. तिची आई मराठी, तर वडील मुस्लीम. नेहा ही तिच्या वडिलांच्या तिसऱ्या बायकोची मुलगी. नेहाच्या आई-वडिलांचं लव्ह मॅरेज. धर्म वेगवेगळे असल्यामुळे दोन्ही परिवारांनी त्यांना स्वीकारलं नाही.

4 / 5
या पोस्टमध्ये नेहानं लिहिलं, ‘हॅप्पी फादर्स डे पापा, मला जन्म देण्यासाठी तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं….’ पुढे तिनं ‘तुमची आठवण येते’ असं लिहिलं आहे.

5 / 5
नेहा खान मूळ अमरावतीची. मुंबईत ऑडिशनला येण्यासाठी तिला खूप कसरत करावी लागायची. वडिलांना समजू नये, यासाठी ती छोटीच बॅग सोबत बाळगायची. फेसबुकवर ओळख झालेल्या ऑडिशन घेणाऱ्या लोकांना भेटायचे. कधी ट्रेन चुकली, तर पेपर टाकून मुंबई छशिमट स्टेशनवर झोपायचे. दोन-तीन वर्ष हा प्रकार केल्याचं नेहा सांगते.