
प्रत्येकजण 10 दिवसांच्या गणेश उत्सवासाठी स्वत: सुंदर दिसू इच्छितो. यामी गौतम गणपती उत्सवासाठी एथनिक लूकमध्ये दिसली.

यामी गौतम हातानं बनवलेल्या डीप पिंक जरी सिल्कच्या साडीमध्ये दिसत आहे. गणेश चतुर्थीला तुम्हीही ही नवीन फॅशन ट्राय करू शकता. यामी बनारसी साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

यामीनं या बनारसी साडीसह एक सुंदर ब्लाउज कॅरी केलं आहे. या सणासुदीच्या हंगामात, आपण स्वत:साठी देखील असंच काहीतरी वापरून पाहू शकता.

यामी या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरतो आहे.

यामीच्या लूकला शिवानी शर्मा यांनी अॅक्सेसराईज केलं आहे. या अॅक्सेसरीजमध्ये यामी खूप सुंदर दिसत आहे.

यामीच्या या साडीचं श्रेय भारतीय हातमाग लक्झरी ब्रँड एक्याला जातं. या साडीची मूळ किंमत डिझायनरच्या वेबसाइटवर 1, 62, 275 रुपये आहे.