
देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यातच काल घरोघरी लक्ष्मीपूजन पार पडले. या लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने सर्वसामान्यांसह राजकीय नेतेमंडळींनी आपपल्या घरी लक्ष्मीपूजन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर त्यांनी कुटुंबासह लक्ष्मीपूजन केले. यावेळी विधीवत पूजा करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर लक्ष्मीपूजन करण्यात आले. याचे काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

यावेळी देवेंद्र फडणवीसांनी निळ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. तर अमृता फडणवीस यांनी सुंदर ड्रेस परिधान केला होता.

यावेळी त्यांची मुलगी दिविजाही पाहायला मिळत आहे. तिनेही राखाडी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. या तिघांनीही मोठ्या भक्तीभावाने लक्ष्मीपूजन केले.

लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर मुंबईतील वर्षा निवासस्थानी सहकुटुंब श्री लक्ष्मीमाता आणि श्रीगणेशाची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. यापूर्वी लक्ष्मीमाता आणि गणेशाची छान अभिषेक करुन पूजा करण्यात आली.