चवीने खाऊ लागले बिर्याणी, पण घासात आलं थेट झुरळ, धाराशिवच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये विचित्र घडलं!

अन्न व औषध प्रशासनाकडून ही कारवाई केली जात असतानाच आता धाराशीवमधून एक मोठी माहिती समोर येत आहे.धाराशिवमधील एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमधील बिर्याणीत चक्क मेलेले झुरळ आढळून आल्याचा दावा केला जातोय.

| Updated on: Jun 08, 2026 | 6:59 PM
1 / 5
अन्न व औषध प्रशासनाकडून सध्या राज्या ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे. वेगवेगळे अन्नपदार्थ तसेच खाद्यपदार्थांमध्ये केल्या जाणाऱ्या भेसळीविरोधात ही कारवाई केली जात आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून या कारवाईला चांगलाच वेग आला आहे. (संग्रहित फोटो)

2 / 5

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून ही कारवाई केली जात असतानाच आता धाराशीवमधून एक मोठी माहिती समोर येत आहे.धाराशिवमधील एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमधील बिर्याणीत चक्क मेलेले झुरळ आढळून आल्याचा दावा केला जातोय. (संग्रहित फोटो)

3 / 5

झुरळ निघाल्याची तक्रार केल्यानंतर ग्राहकाला हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांकडून दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 40 किलोमीटर अंतर कापून बिर्याणी खायला आलो मात्र बिर्याणीत झुरळे निघाल्याने ग्राहकाने संताप व्यक्त केला आहे. (संग्रहित फोटो)

4 / 5

धाराशिवसह अनेक शहरात या बिर्याणी हॉटेलच्या अनेक शाखा आहेत. मुख्य शाखेतील बिर्याणीतच झुरळ निघाल्याने वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. झुरळ निघाल्याची तक्रार केल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने ग्राहकाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

5 / 5

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ग्राहकाने याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार दिलेली आहे. या प्रकरणी हॉटेल मालकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हॉटेल मालकाने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us