
नारळ हा आरोग्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. त्यातील पोषक घटक केवळ एकच नाही तर अनेक गोष्टी संतुलित करण्यास मदत करतात. इलेक्ट्रोलाइट्स शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.

नारळाच्या पाण्यात कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक असतात... पण, भरपूर पौष्टिक मूल्य असूनही, नारळाचं पाणी कोणी पिणं टाळावं हे जाणून घेऊया.

तज्ज्ञ पोषणतज्ञ श्वेता शाह यांनी इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे की कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी नारळ पाणी पिऊ नये. कारण कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी नारळ पाणी प्यायले तर ते त्यांचा रक्तदाब आणखी कमी करू शकतो

त्यांनी असेही म्हटलं की, पचनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी देखील नारळपाणी पिणं टाळलं पाहिजे. ज्यामुळे यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. नारळपाणी सर्वांसाठीच योग्य नाही..

उन्हाळ्यात नारळपाणी पिणं सामान्यतः फायदेशीर मानलं जातं कारण त्यामध्ये थंडावा असतो. पण, सर्दी आणि फ्लूचा त्रास असलेल्यांनी नारळ पाणी पिणं टाळावं. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी देखील आठवड्यातून एकदाच ते प्यावं.