
जर तुम्हाला देखील हॉरर चित्रपट बघायला आवडत असतील तर आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो थेट हॉरर नसला तरी तो पाहिल्यानंतर अंगावर काटा येईल. या चित्रपटाचे नाव ऐकताना देखील अनेकांना बसतो धक्का. मात्र त्याच्या नावापेक्षा त्याची कथा अधिक प्रभावी आणि वास्तववादी आहे.

2010 साली प्रदर्शित झालेल्या 'लव्ह सेक्स और धोका' या चित्रपटाची त्याच्या नावामुळे प्रचंड चर्चा रंगली होती. अनेकांना वाटले होते की चित्रपटात फक्त अश्लीलता किंवा वादग्रस्त गोष्टी असतील पण प्रत्यक्षात हा चित्रपट समाजातील एक गंभीर आणि काळा चेहरा उघड करतो.

त्या काळात एमएमएस स्कँडल्स आणि डिजिटल माध्यमांचा वेगाने वाढता प्रभाव यामुळे या चित्रपटाची कथा अधिक वास्तवाशी जोडलेली. 2 तास 35 मिनिटांच्या या चित्रपटाने तीन वेगवेगळ्या कथांमधून डिजिटल युगातील नातेसंबंध, फसवणूक आणि गुन्हेगारी वास्तव दाखवले.

विशेष म्हणजे, हा चित्रपट पूर्णपणे सीसीटीव्ही, मोबाईल आणि हिडन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शूट करण्यात आला आहे, जे त्या काळात एक वेगळा आणि प्रयोगशील दृष्टिकोन होता. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर तो Netflix वर उपलब्ध आहे.

बजेट आणि कमाईच्या दृष्टीने पाहिले तर हा चित्रपट सुमारे 4.5 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता आणि त्याने जवळपास 13 कोटी रुपयांची कमाई केली. IMDb वर या चित्रपटाला 7.1 अशी चांगली रेटिंग मिळाली आहे.