
महिला क्रिकेटपटूंच्या बॅट पुरुष क्रिकेटपटूंच्या बॅटपेक्षा थोड्या आकाराने लहान आणि वजनाने थोड्या हलक्या असतात.इतके नव्हे तर इतर क्रीडा साहित्यातही थोडा फरक असतो. महिला क्रिकेटमध्ये वापरला जाणारा चेंडू देखील पुरुष क्रिकेटर पेक्षा वेगळा असतो. काय आहेत बदल नेमके ते जाणून घेऊया.

जगातील सर्वात मोठ्या महिला क्रिकेट स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या, WPL 2026 मध्ये जगभरातील अनेक नामांकित महिला क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. या हंगामात एकूण 28 दिवसांत 22 सामने खेळले जाणार आहेत.मात्र, महिला क्रिकेटचे नियम हे पुरुषांच्या क्रिकेटपेक्षा वेगळे आहे का ? यासोबतच, महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंच्या बॅटमध्ये काय असतो फरक हे पाहूयात...

महिला आणि पुरुष क्रिकेटमधील सर्वात मोठा बदल म्हणजे चेंडूचे वजन. महिला क्रिकेटमध्ये वापरला जाणारा चेंडू पुरुषांच्या क्रिकेटपेक्षा थोडा हलका असतो. साधारणपणे, महिला क्रिकेट स्पर्धांमध्ये १४० ते १५१ ग्रॅम वजनाचा चेंडू वापरला जातो, तर पुरुषांच्या क्रिकेटमध्ये १५५ ते १६५ ग्रॅम वजनाचा चेंडू वापरला जातो. मात्र, दोन्ही चेंडूचा आकार सारखाच असतो. महिलांची शक्ती आणि गोलंदाजीचा वेग लक्षात घेऊन, चेंडू हलका थोडा केला जातो, ज्यामुळे त्यांना चेंडूला अधिक स्विंग आणि हालचाल देता येईल.

महिला क्रिकेट स्पर्धांमध्ये मैदानाचा आतील सर्कल पुरुष क्रिकेटपेक्षा थोडे लहान असते. आयसीसीच्या नियमांनुसार, महिला क्रिकेटमध्ये अंतर्गत वर्तुळाची त्रिज्या २३ मीटर असते, तर पुरुष क्रिकेटमध्ये ती २७.४३ मीटर इतकी ठेवली जाते.महिलांची ताकद पाहून हा वर्तुळाचा आकार कमी करण्यात आला आहे. मैदानातील अंतर्गत वर्तुळ थोडे असल्याने महिला क्रिकेटपटूंना पॉवरप्ले दरम्यान अधिक आक्रमक शॉट्स खेळण्याची संधी मिळते.

महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंच्या बॅटमध्येही फरक आहे. पुरुष क्रिकेटपटूंच्या बॅटचे वजन साधारणपणे ११३४ ग्रॅम ते १३६० ग्रॅम दरम्यान असते. तर महिला क्रिकेटपटूंच्या बॅटचे वजन थोडे हलके असते, १०४९ ग्रॅम ते ११९० ग्रॅमपर्यंत ठेवलेले असते. महिलांची सरासरी ताकद लक्षात घेऊन बॅट हलक्या बनवलेल्या असतात.