Suresh Raina Lavish Home Tour : सुरेश रैनाचं आलिशान घर पाहून हरखून जालं, सौंदर्य असं की पाहत बसाल, घराच्या गच्चीवर करतो शेती
Suresh Raina Lavish Home Tour : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाचं घर खूपच सुंदर आहे. या घराच्या भिंती, इंटिरिअर पाहून तुम्ही सुद्धा म्हणालं घर असावं तर असं. आलिशान, आरामदायक यात कुठेही हे घर कमी नाहीय.

माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचं दिल्ली मधील घर हे लग्जरी आणि कौटुंबिक आनंद याचं उत्तम मिश्रण आहे. वसंत कुंजच्या पॉश भागात हा बंगला आहे. त्याच्या किंमतीचा अंदाज लावणं कठीण आहे.
कर्ली टेल्सच्या यूट्यूब व्लॉगमध्ये सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियंका यांनी घराचं दर्शन घडवलं. रैनाचं घर पाहून फॅन्सना विश्वास बसत नाहीय. सुरेश रैना घराच्या गच्चीवर फळ-भाज्या पिकवतो.
रैनाच्या दिल्लीत घरात कंटेंपररी डिजाइन आणि आर्ट डेको स्टाइलचा सुंदर मिलाफ आहे. घराचं इंटीरियर प्रामुख्याने सफेद रंगावर आधारित आहे. यात पिवळ्या रंगाचा पास्टल शेड आणि स्टायलिश फर्नीचर सौंदर्य वाढवतं.
ड्रॉइंग रुम खूप मोठा आहे. तिथे 20 ते 30 लोक आरामात एकत्र बसू शकतात. सेंटर सोफा, कॉर्नर चेअर, टीवी यूनिट, पियानो, रोपटी आणि भिंतीवर रॅकवरील सुंदर वस्तू घराचं सौदर्य वाढवतं.
घराचा एक भाग सुरेश रैनाच्या क्रिकेट करिअरला समर्पित आहे. एका कोपऱ्यात काळ्या आणि गोल्डन रंगाचं कॉम्बिनेशन आहे. त्यावर रैनाने मिळवलेल्या ट्रॉफी आणि करिअरमधील आठवणींचा ठेवा आहे.