
Cristiano Ronaldo याचा सौदी अरेबियातील क्लब अल नासरसोबतचा करार पुढील दोन वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे. तो 2027 पर्यंत या क्लबसोबत असेल.

क्लबने साईन करताना त्याच्यावर पैशांचा पाऊस पाडला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वार्षिक पगार 178 दशलक्ष पौंड म्हणजे 2000 कोटी रुपये असेल.

तर त्याला सायनिंग बोनस म्हणून पहिल्या वर्षी 264.6 कोटी आणि पुढील वर्षी 410.4 कोटी रुपये मिळतील. ही आकडेवारी अकल्पनीय आहे. पण स्टार खेळाडूसाठी अल-नासेर क्लब इतकी मोठी रक्कम मोजली आहे.

सौदी प्रो लीग जिंकल्याबद्दल रोनाल्डोला 8 दशलक्ष पौंड म्हणजेच 86.4 कोटी रुपये बोनस देण्यात येईल. इतकेच नाही तर आशियाई चॅम्पियन्स लीग जिंकल्यामुळे 6.5 दशलक्ष पौंड म्हणजे 70.2 कोटी रुपये सुद्धा त्याला मिळणार आहे.

इतकेच नाही तर रोनाल्डोने गोल्डन बूट जिंकला तर 43.2 कोटी, पहिल्या वर्षी केलेल्या प्रत्येक गोलसाठी 86.4 कोटी, तर दुसऱ्या वर्षी 1 कोटींहून अधिकची घशघशीत रक्कम मिळेल.

रोनाल्डोने गोलसाठी सहाय्य केल्यास पहिल्या वर्षी 43.2 लाख, दुसऱ्या वर्षी 50 लाखांहून अधिकची रक्कम मिळेल

इतकेच कमी की काय, त्याल नासेर क्लबमध्ये 15 टक्क्यांचा वाटा सुद्धा देण्यात येईल. एका अंदाजानुसार, त्याची रक्कम 356.4 कोटींच्या घरात जाईल.