
2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी अधिक चमकदार कामगिरी केली आहे. बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या खेळांच्या आठव्या दिवशी कुस्तीपटूंनी आपली चुणूक दाखवली. बजरंग पुनिया, दीपक पुनिया आणि साक्षी मलिक यांनी सुवर्णपदकावर कब्जा केला, तर अंशू मलिकने रौप्यपदक जिंकले. तर दिव्या काकरन आणि मोहित ग्रेवाल यांना कांस्यपदक मिळवण्यात यश आले. कुस्तीमध्ये मिळालेल्या या सहा पदकांमुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या आता 26 झाली असून त्यात 9 सुवर्णांचा समावेश आहे. अंशू मलिकने 57 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले.

62 किलो वजनी गटात साक्षी मलिकने सुवर्णपदक जिंकले.

पुरुषांच्या 125 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.

बजरंग पुनियाने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेतील त्याचे हे सलग तिसरे पदक आहे.

दिव्या काकरनने 68 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेतील त्याचे हे सलग दुसरे पदक आहे.