Cyclone Alfred : 50 वर्षांमधील सर्वात भीषण चक्रीवादळ;100 किमी वेगानं धडकणार, अतिमुसळधार पावसाचा अलर्ट
हवामान विभागाकडून पुन्हा एकदा भीषण अशा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे, गेल्या 50 वर्षांमध्ये असं चक्रीवादळ पाहिलं नव्हतं, एवढं मोठं हे चक्रीवादळ असणार आहे.

- हवामान विभागाकडून पुन्हा एकदा भीषण अशा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे, गेल्या 50 वर्षांमध्ये असं चक्रीवादळ पाहिलं नव्हतं, एवढं मोठं हे चक्रीवादळ असणार आहे.
- अल्फ्रेड असं या चक्रीवादळाचं नाव आहे, शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटे सहावाजेदरम्यान हे चक्रीवादळ समुद्र किनाऱ्याला धडकणार आहे. या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
- या चक्रीवादळाचा वेग तब्बल 95 ते 100 किलोमीटर प्रती तास इतका असणार आहे. या चक्रीवादळामुळे जवळपास 25 लाख लोकांवर मोठं संकट निर्माण झालं आहे.
- हे चक्रीवादळ ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणार आहे. सध्या ब्रिस्बेन शहराकडे या चक्रीवादळाची वाटचाल सुरू असून, शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटेच्या सुमारास हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.
- गेल्या 50 वर्षांमधील हे सर्वात मोठं चक्रीवादळ असून, तब्बल 25 लाख लोकांना या चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे. लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम सुरू असून, रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- ऑस्ट्रेलियांच्या हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यावर प्रचंड उंचीच्या लाटा निर्माण झाल्या आहेत. तब्बल 12.3 मीटर उंचीच्या या लाटा निर्माण झाल्या आहेत.
- चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, कोणही समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, असा इशारा तेथील स्थानिक सरकारकडून देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us