तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर निवार हे वादळ काल रात्री 11.30 च्या सुमारास धडकले. मुसळधार पावसामुळे चेन्नईचा पूनमल्ली परिसर जलमय झाला आहे.
1/6

तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर निवार हे वादळ काल रात्री 11.30 च्या सुमारास धडकले. मुसळधार पावसामुळे चेन्नईचा पूनमल्ली परिसर जलमय झाला आहे. वादळी पावसामुळे काही तासांत ठिकठिकाणी पाणी भरल्याने तामिळनाडू, पुद्दुचेरीतील सुमारे एक लाख नागरिकांना तातडीने अन्यत्र स्थलांतरित करण्यात आलं आहे.
2/6

Indian Meteorological Department ने दिलेल्या माहितीनुसार पुद्दुचेरीत हवेचा वेग 65 ते 75 किलोमीटर प्रतितास राहील. हवेचा वेग काही प्रमाणात कमी झाला आहे परंतु धोका अजूनही टळलेला नाही.
3/6

Cyclone Nivar मुळे कड्डलोर, पुद्दुचेरीसहित अनेक जिल्ह्यात मागील 17 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सुरक्षिततेसाठी किनारपट्टीवर आणि जवळच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
4/6

चेन्नई आणि आजूबाजूच्या परिसरात रात्रभर पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन तामिळनाडूत बुधवारी (25 नोव्हेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आजही लोकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
5/6

तामिळनाडू आणि पद्दुचेरीत आज (26 नोव्हेंबर) UGC-NET च्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, निवार चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर तामिळनाडूच्या 13 जिल्ह्यांमध्ये 26 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
6/6

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची 25 पथकं दोन दिवसांपासून विविध भागात तैनात करण्यात आली आहेत. एनडीआरएफचे महासंचालक एन एस प्रधान यांनी सांगितले की, केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन एकत्र मिळून काम करत आहेत. कमीत कमी नुकसान व्हावं, यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न सुरु आहेत”