Daily Horoscope : तीन राशींचं नशीब फळफळणार, महालक्ष्मी राजयोगामुळे पडणार पैशांचा पाऊस; वाचा काय काळजी घ्यावी?

16 मार्च रोजी तीन राशींच्या नशिबात महालक्ष्मी राजयोग आहे. त्यामुळे या रोशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. परंतु या राशींनी काही खबरदारी घेणेही गरजेचे आहे.

| Updated on: Mar 15, 2026 | 8:10 PM
1 / 5
ज्योतिषशास्त्रात चंद्र आणि मंगळ ग्रहांची चाल फार महत्त्वाची मानली जाते. मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती मानले जाते. तर चंद्रदेवाला भावनांशी जोडले जाते. येत्या 16 मार्च रोजी चंद्र कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. याच राशीत मंगळ ग्रह आहे.

ज्योतिषशास्त्रात चंद्र आणि मंगळ ग्रहांची चाल फार महत्त्वाची मानली जाते. मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती मानले जाते. तर चंद्रदेवाला भावनांशी जोडले जाते. येत्या 16 मार्च रोजी चंद्र कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. याच राशीत मंगळ ग्रह आहे.

2 / 5

त्यामुळे चंद्र आणि मंगळ ग्रहाच्या युतीचा अनेक राशींवर प्रभाव पडणार आहे. काही राशींना या युतीचा फायदा होणार आहे. तर काही राशींवर त्याचा वाईट प्रभाव पडेल. चंद्र आणि मंगळ ग्रहाची युती झाल्यामुिळे महालक्ष्मी राजयोग तया झाला आहे. त्याचा फायदा वृश्चिक राशीला होऊ शकतो. वृश्चिक राशीला मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

3 / 5

दुसरीकडे कर्क राशीच्या लोकांनाही महालक्ष्मी राजयोगाचा फायदा होण्याची शक्यता आहे. व्यावसायात एखादा मोठा आणि चांगला करार होण्याची शक्यता आहे. मोठा धनलाभ होऊ शकतो. तसेच व्यर्थ खर्च करणे टाळावे. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

4 / 5

मेष राशीच्या लोकांसाठीही महालक्ष्मी राजयोग खूप चांगला ठरणार आहे. 16 मार्च रोजी मेष राशींच्या आयुष्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तसेच मेष राशीच्या लोकांना धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. अडकून पडलेले पैसे मिळू शकतात. मित्रांशी व्यवहार करताना थोडी काळजी घ्या.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us