कडुलिंबाची पाने आणि कोरफडीपासून बनवा घरगुती अँटी-डँड्रफ शॅम्पू; कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम!
हिवाळ्यात कोरडी त्वचा आणि कोंड्याच्या समस्येने खूप त्रस्त होतं. यावर असलेल्या लोकांसाठी, कडुनिंब आणि कोरफडीपासून घरी तयार केलेले अँटी-डँड्रफ शॅम्पू फायदेशीर ठरू शकते.

हिवाळ्यात हवेत आर्द्रता कमी असल्याने त्वचा आणि टाळू कोरडे पडतात. त्यामुळे डोक्यात खाज येणे आणि कोंडा होण्याची समस्या वाढते.
३-४ तुकडे शिकेकाई, ४-५ तुकडे रिठा, ८-१० कडुलिंबाची पाने, १ चमचा मेथीदाणे, २ चमचे ताजे कोरफडीचे जेल आणि २-३ कप पाणी घ्या.
शिकेकाई, रिठा आणि मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्यात कडुलिंबाची पाने आणि पाणी घालून १०-१५ मिनिटे मंद आचेवर उकळा.
मिश्रण थंड झाल्यावर रिठा आणि शिकेकाईच्या बिया काढून ते मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर मिश्रण गाळून त्यात कोरफडीचे जेल मिसळा.
केस धुताना १-२ चमचे शॅम्पू टाळूला लावा आणि २-३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता.
रिठा आणि शिकेकाईमधील सॅपोनिनमुळे टाळूवरील अतिरिक्त तेल आणि घाण स्वच्छ होण्यास मदत होते. कोरफड आणि मेथीदाणे केसांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करू शकतात.