
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा सत्कार पार पडला. चौघांनाही प्रत्येकी १ कोटी रूपये बक्षीस देण्यात आलं.

या कार्यक्रमामध्ये फायनल सामन्याला कलाटणी देणारा ठरलेल्या सुर्याच्या कॅचवरून सर्वांनी जोरदार बॅटींग केली. या कॅचवर सूर्या बोलला की तो कॅच हातात बसला. यानंतर रोहितसह अजित पवारांनी त्याची चांगली फिरकी घेतली.

सूर्या बोलला की तो कॅच हातात बसला पण यावर रोहित शर्मा म्हणाला, बर झालं तो बॉल हातात बसला नाहीतर पूढे तर त्याला बसवलं असतं, त्यानंतर सभागृहात सर्वजण हसू लागले.

सूर्याचा कॅच त्यावर रोहितची प्रतिक्रिया याची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर भाषणासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीपण रोहितच्या वक्तव्याचा धागा पकडत त्याची फिरकी घेतली.

भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागले होते. पण जर कॅच सुटला असता तर रोहितने एकट्याने नाहीतर आम्ही सर्वांनी तुला बघितलं असतं, असं अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. आपल्याकडे खिलाडूपणा पाहायला मिळत नसल्याचंही दादांनी सांगितलं.