
बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील अभिनेते दीपक तिजोरीची मुलगी समारा आता मोठी झाली आहे. दीपक तिजोरी यांनी अनेक चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिकासुद्धा साकारली आहे.

आता गेले अनेक दिवस ते इंडस्ट्रीपासून दूर आहे. मात्र, त्यांची मुलगी समारा बर्याचदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. ती नेहमी आपल्या फोटोंद्वारे चाहत्यांची मनं जिंकते.

समारा सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव आहे. अर्थात समरा आपल्या हॉटनेसमुळे आणि हटके स्टाईलमुळे हेडलाइन्समध्ये कायम असते. इन्स्टाग्रामवर तिचे 15 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अनेक फोटोशूट्स, व्हिडिओ आणि पोस्ट ती चाहत्यांसोबत शेअर करते. समाराला तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवण्याची इच्छा आहे. त्यासाठी ती या काळात काही ऑनलाईन अभिनयाचे क्लास घेत आहे.

दीपक तिजोरीप्रमाणे तिलाही चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्याची इच्छा आहे. समारा तिजोरी सध्या 25 वर्षांची आहे आणि बॉलिवूडमध्ये अनेक सुंदर कलाकारांना ती टक्कर देते. तिचे अनेक चाहते आहेत.

जाह्नवी कपूर पासून तर सारा अली खानपर्यंत सगळ्यांसोबत ती स्पर्धा करते. विशेष म्हणजे समारा तिजोरीनं शॉर्ट फिल्मद्वारे डेब्यू केला आहे. ती 'ग्रँड प्लान' चित्रपटात दिसली होती. या सिनेमात समाराने बरेच सीन दिले आहेत.

याशिवाय तिच्या लिपलॉक सीनची बरीच चर्चा होती. याशिवाय 2016 मध्ये आलेल्या ‘ढिशूम’ चित्रपटामध्ये समारानं सहाय्यकाची भूमिका साकारली आहे. कॅमेर्यामागे तिनं काम केलं होतं.

या चित्रपटात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसला होता. समाराला प्रवासाची खूप आवड आहे. सध्या तिनं अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.