

या सिनेमाबाबत सध्या कुठलीही औपचारिक माहिती मिळाली नसली तरी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 'पठाण'मध्ये शाहरुख खानसोबत अभिनेत्री दीपिका पदूकोण झळकणार आहे.

यापूर्वी 'ओम शांती ओम' आणि 'चेन्नई एक्सप्रेस'सारख्या सुपरडुपर हिट सिनेमांमधून या दोघांच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

या चित्रपटासाठी दीपिकानं भरघोस मानधन घेतल्याचं कळतंय. रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी तिनं 15 करोड रुपये मानधन घेतलं आहे.

केवळ 'पठाण'च नव्हे तर 'शकून बात्रा' या सिनेमातही दीपिका झळकणार आहे.