
अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे नुकतेच युएसच्या ट्रिपवरून परतले आहेत. रणवीरच्या 37व्या वाढदिवसानिमित्त हे दोघं एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी अमेरिकेला गेले होते.

या ट्रिपचे आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. रणवीरसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत दीपिकाने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

10 जुलै रोजी हे दोघं मुंबईला परतले. मुंबई विमानतळावर हातात हात घालून चालतानाचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पापाराझींनी शूट केले होते.

'आपलं आयुष्य अशाच अनुभवांनी आणि साहसांनी भरलेलं असो', असं कॅप्शन देत दीपिकाने हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये रणवीर-दीपिकाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय.

या ट्रिपदरम्यान दीपिकाने फोटोग्राफीचाही आनंद लुटला. समुद्रकिनाऱ्यावरील तिने टिपलेला हा फोटो..

रणवीर आणि दीपिकाने 'गोलियों की रासलीला- रामलीला' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. इटलीतील लेक कोमो याठिकाणी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.

लग्नानंतर '83' या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केलं. या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली.

रणवीर लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात आलिया भट्टसोबत काम करताना दिसणार आहे. रणवीरने अमेरिकेत नुकतंच मॅन व्हर्सेस वाईल्ड या आव्हानात्मक शोचं शूटिंग पूर्ण केलं.