
बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' दीपिका पडूकोण आज 40 वा वाढदिवस साजरा करते आहे. 5 जानेवारी 1986 ला डेन्मार्कमध्ये जन्मलेल्या दीपिकाचे आज जगात लाखो चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये तिने मोठं नाव कममत चांगलीच प्रसिद्धीही मिळवली. साऊथमधून आपल्य करिअरला सुरूवात करणाऱ्या दीपिकाने बॉलिवूडमध्ये बस्तान बसवलंच पण हॉलिवूडमध्येही काम करत तिचा ठसा उमटवला.प्रचंड लोकप्रियतेसोबतच तिने चांगलीच कमाई करत संपत्ती कमावली. जाणून घेऊया तिचं नेटवर्थ.. (Photos : Instagram)

दीपिका पदुकोणने 2006 मध्ये कन्नड चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, बॉलिवूड पदार्पणाने तिला खरी ओळख मिळाली. 2007 मध्ये तिच्या शाहरुख सोबत "ओम शांती ओम" या चित्रपटानत काम करत तिने बॉलिवूड डेब्यू केला आणि चांगलीच खळबळ उडाली. आज तिचं स्टारडम एका वेगळ्याच पातळीवर आहे. दीपिका ही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे आणि बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्येही तिचा समावेश आहे.

अवघ्या 19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या डीपिकाने तिच्या चित्रपटांसाठी मोठी फी वसूल केली आहे. रिपोर्ट्सनुसार, दीपिरा ही एका चित्रपटासाठी 20 ते 30 कोटी फी चार्ज करते. अभिनेता आणि तिचा पती रणवीर सिंग याच्यासोबत दीपिका मुंबईत राहते त्या घराची किंमत 120 कोटी रुपये इतकी आहे.

दीपिका पदुकोणच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, लाईफस्टाईल एशिया हाँगकाँगच्या अहवालानुसार, तिची एकूण संपत्ती 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्रीचे उत्पन्न ब्रँड एंडोर्समेंट आणि तिच्या स्वतःच्या मेकअप ब्रँड, 82°E मधूनही येतं.ती प्रत्येक एंडोर्समेंट डीलमधून किमान 8 कोटी रुपये कमावते.

दीपिका पदुकोणकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. तिच्या कार कलेक्शनमध्ये 64 लाखांची BMW 5 सिरीज, 1.67 कोटी किमतीची Mercedes Maybach S500 आणि दोन ऑडी मॉडेल्स (A8 आणि Q7) यांचा समावेश आहे.

दीपिकाकडे असलेल्या या कारपैकी एका कारची किंमत 1.57 कोटी रुपये आणि दुसऱ्या कारची किंमत 93.35 लाख रुपये आहे. अलिबाग येथेही तिची काही प्रॉपर्टी आहे.