
दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन यांनी पीकू या चित्रपटामध्ये एकसोबत काम केले आहे. विशेष म्हणजे पीकू या चित्रपटाला चाहत्यांचे देखील मोठे प्रेम हे मिळाले आहे. या चित्रपट हिट ठरला.

दीपिका पादुकोण हिने धक्कादायक खुलासा करत अमिताभ बच्चन यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप हा केला. दीपिका पादुकोण हिने चक्क अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप केला.

दीपिका पादुकोण म्हणाली की, अमिताभ बच्चन हे माझे जेवण चित्रपटाच्या सेटवर चोरत होते. विशेष म्हणजे दीपिका पादुकोण हिने ज्यावेळी हा खुलासा केला त्यावेळी अमिताभ बच्चन हे देखील जवळच होते.

अमिताभ बच्चन म्हणाले की, लोक तीन तासांच्या अंतराने साधारण जेवण करतात. मात्र, दीपिका ही तीन मिनिटांच्या अंतरावर खात असते दिवसभर. तरीही हिचे वजन वाढत नाही.

पीकू या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन हे वडिलांच्या तर दीपिका पादुकोण ही मुलीच्या भूमिकेत होती. विशेष म्हणजे दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये एक चांगले नाते आहे.