
राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहेत. या स्फोटानंतरचे काही फोटो समोर आले आहेत.

ही गाडी लाल किल्ला परिसरातील मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर उभी होती. या गाडीत झालेल्या स्फोटानंतर बाजूला उभ्या असलेल्या दोन कारला आग लागलेली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

या स्फोटानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. कारमधील स्फोटानंतर आग लागली आसपास आल लागली आहे. ही आग विझविण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून केला जात आहे.

बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. कारमध्ये स्फोट नेमका का झाला? यामागे काही घातपाताचा उद्देश तर नव्हता ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता शोधली जाणार आहेत.

संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी ही घटना घडली आहे. या स्फोटावेळी कारमध्ये कोण होत? ही गाडी कुठून आली होती याचा शोध घेण्यात येणार आहे. या घटनेमुळे राजधानीत भीतीचे वातावरण पसरले आहे.