असं काय घडलं? पाकिस्तानमध्ये अचानक गायीच्या शेणाची मागणी प्रचंड वाढली, पाक सरकार करतय खास प्रयोग

पाकिस्तान गायींसोबत एक नवा प्रयोग करत आहे, यामुळे तिथे गायीच्या शेणाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून, भाव देखील वाढला आहे.

| Updated on: Dec 17, 2024 | 6:32 PM
1 / 7
पाकिस्तान गायींसोबत एक नवा प्रयोग करत आहे, भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्ये देखील गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्याचा उपयोग हा इंधनासाठी होतो.मात्र आता पाकिस्तान सरकारने गाईच्या शेणापासून एक ग्रीन प्रोजेक्ट सुरू केला आहे.असं करणारा पाकिस्तान हा जगातील पहिलाच देश ठरला आहे.

पाकिस्तान गायींसोबत एक नवा प्रयोग करत आहे, भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्ये देखील गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्याचा उपयोग हा इंधनासाठी होतो.मात्र आता पाकिस्तान सरकारने गाईच्या शेणापासून एक ग्रीन प्रोजेक्ट सुरू केला आहे.असं करणारा पाकिस्तान हा जगातील पहिलाच देश ठरला आहे.

2 / 7

गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानचं या प्रोजेक्टवर संशोधन सुरू आहे, ज्यामुळे देशातील प्रदूषण नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत होत आहे.असं करणारा पाकिस्तान हा जगातील पहिलाच देश आहे.

3 / 7

पाकिस्तानच्या कराची शहरात धावणाऱ्या दोनशेंहून अधिक बस या गायीच्या शेणापासून तयार केलेल्या इंधनावर धावत आहेत. या प्रोजेक्टला ग्रीन बस रॅपिड ट्रांजिट (बीआरटी) बस नेटवर्क असं नाव देण्यात आलं आहे. या अंतर्गत गायींच्या शेणापासून इंधन बनवलं जातं आणि त्या इंधनावर बस धावतात.

4 / 7

पाकिस्तानमध्ये गायीच्या शेणापासून मिथेन वायूची निर्मिती सुरू आहे, याचा उपयोग हा वाहनांसाठी इंधन म्हणून करण्यात येत आहे.पाकिस्तानच्या कराचीमध्ये हा प्रयोग सुरू आहे.

5 / 7

नुकत्याच करण्यात आलेल्या पशु गणनेनुसार पाकिस्तानमध्ये चार लाखांहून अधिक गाई, म्हशींची संख्या आहे. जागतिक बँकेनं केलेल्या आर्थिक सहाय्याच्या मदतीनं पाकिस्तानने हा प्रकल्प सुरू केला आहे.

6 / 7

या प्रोजेक्टचा फायदा असा झाला की येथील शेतकऱ्यांच्या शेणाला चांगला भाव मिळू लागला, तसेच पाकिस्तानची ऊर्जा समस्या दूर होण्यास देखील मदत झाली आहे.

7 / 7

गायीच्या शेणाला चांगला भाव मिळत असल्यामुळे येथील शेतकरी देखील आता पशु पालनाकडे वळले असून, गायींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us