Mohsin Naqvi: टीम इंडियाने ट्रॉफी नाकारली, पण बीसीसीआयचे सचिव मात्र नक्वींना भेटले असं का? आता दिलं स्पष्टीकरण
Devajit Saikia: भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारली नाही पण इथे बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया हे मात्र मोहसिन नक्वी यांना भेटले. आता ते का भेटले याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

टीम इंडियाच्या महिला संघाने रविवारी श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करत आठव्यांदा आशिया कपची ट्रॉफी जिंकली. आशिया कप इतक्यांदा जिंकणाऱ्या टीम इंडिया ही पहिलीच टीम बनली.
या विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये मोठा ड्रामा झाला .प्रेझेंटेशन दरम्यान टीम इंडिया मैदानात आलीच नाही आणि तिकडे एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी ताटकळत उभे राहिले ते. पण 40 मिनिटे ताटकळत उभे राहिल्यानंतर शेवटी त्यांनी स्टेज सोडला.
इथे भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार कळवला पण बीसीसीआयचे सेक्रेटरी देवाजित सैकिया यांनी मात्र मोहसिन नक्वी यांची भेट घेतल्याचा फोटो व्हायरल झाला.
मोहसीन नक्वी यांच्यासोबतच्या या भेटीनंतर वाद पेटल्यानंतर आता देवाजित सैकीया यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "असे नाही की आम्ही कोणालाच भेटत नव्हतो. मी बाहेर रॉयल बॉक्सच्या आसनांवर बसलो होतो. सामन्यादरम्यान आलेले प्रत्येकजण मला भेटले. कोणीतरी माझ्या शेजारी बसले. तुम्ही उल्लेख केलेली व्यक्तीसुद्धा येऊन खालिद साहेबांच्या बाजूला बसली. ही एक सामान्य परंपरा आहे, जेव्हा कोणी येते, तेव्हा आम्ही सर्वांना भेटतो आणि बोलतो,असे देवाजित सैकिया यांनी सांगितले.
"आपल्या देशातील सर्व नागरिकांकडून आमच्यावर दबाव होता की आपण आपल्या शेजारी देशाशी कोणतेही संबंध ठेवू नयेत आणि त्यांच्यासोबत क्रिकेट खेळू नये. पण आमच्या सरकारचे धोरण आहे की आपण बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रत्येक देशाविरुद्ध खेळलेच पाहिजे, तसेच या भेटीत दोघांमध्ये कुठल्याप्रकारच हँडशेक झालं नाही फक्त नक्वीने सैकिया आणि राजीव शुक्ला यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.