त्याने पोलिसांनासुद्धा गंडवलं; ‘देवमाणूस’मधील अभिनेत्रीची झाली फसवणूक, वाचा नेमकं काय झालं?

देवमाणूस या मालिकेत काम करणारी अभिनेत्री अस्मिता देशमुख सध्या चर्चेत आहे. तिची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अस्मिताने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

| Updated on: Sep 21, 2025 | 4:33 PM
1 / 7
झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'देवमाणूस' ही मालिका पाहिली जाते. या मालिकेतील पात्रांना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतून संपूर्ण महाष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अस्मिता देशमुख. सध्या अस्मिता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

2 / 7
'दहीहंडी 2025'च्या इव्हेंटसाठी सेलिब्रिटी मॅनेजर सुजित सरकाळेने अस्मिताला एक इवेंटसाठी बोलावले होते. त्याने तिला अर्धे पैसे इवेंट आधी दिले आणि राहिलेले इवेंटदरम्यान देतो असे सांगितले होते. पण त्याने इवेंट झाल्यानंतरही ते पैसे दिले नाहीत. तसेच पोलिसांनाही गंडवले असल्याचे अस्मिताने म्हटले आहे.

3 / 7
अस्मिताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट्या स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती "नमस्कार. मी अस्मिता देशमुख. व्हिडीओ बनवण्याचे कारण एकच आहे की जेवढे काही सेलिब्रिटी आहेत, जेवढे रिल-स्टार्स आहेत तेवढ्या सगळ्यांना मला अलर्ट करायचे आहे. एक माहिती मला तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे" असे बोलताना दिसत आहे.

4 / 7
"मध्यंतरी मी दहिहंदीचा एक इव्हेंट केला होता. सुजित सरकाळे याने मला इव्हेंट दिला होता. माझ्यासह इतरही अनेक सेलिब्रिटी या इव्हेंटमध्ये होत्या. हा किस्सा माझ्याबाबतही नाही तर तुमच्याबाबतही घडू शकतो" असे अस्मिता पुढे म्हणाली.

5 / 7
अस्मिता पुढे म्हणतेय,"सुजित सरकाळेने मला अर्धे पैसे पाठवले आणि बाकीचे इव्हेंटदरम्यान देणार होता. ठरल्याप्रमाणे मी इव्हेंटला गेले. इव्हेंट झाल्यानंतर त्याने मला पैसे पाठवल्याचे काही स्क्रीनशॉट पाठवले. त्या स्क्रीनशॉटमध्ये पैसे आल्याचे दिसत असले तरी माझ्या अकाऊंटला मात्र ते पैसे आलेच नव्हते. सर्वर डाऊन, बँक इश्यू अशी कारणे त्याने मला दिली."

6 / 7
"आठवडा गेल्यानंतर माझ्या ही गोष्ट लक्षात आली की हा खूप मोठा स्कॅम माझ्यासोबत घडलाय. इतरांच्या बाबतही हे घडू शकते. फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून हा स्कॅम होत आहे. खूपदा मी व्यवस्थितपणे त्याच्याकडे पैशांची मागणी केली" असे तिने म्हटले.

7 / 7
"पोलीसांकडे तक्रार केली. त्यांनासुद्धा त्याने गंडावले. मला कळकळीची विनंती करायची आहे की, कोणताही इव्हेंट करण्याआधी पूर्ण पैसे घ्या" अशी माहिती अस्मिताने दिली आहे.