Photo : लाडक्या लेकीसाठी कायपण… बापाने असं काही केलं की अख्खं गाव पाहात राहिलं; हळदीच्या दिवशी काय घडलं?

धाराशिव येथील अशोक वेताळ यांनी आपल्या लाडक्या लेकीच्या हळदी सोहळ्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करून सर्वांनाच चकित केले. मुलीवरील अथांग प्रेम दाखवत त्यांनी अख्ख्या गावातील आणि पंचक्रोशीतील लोकांची मने जिंकली. हा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती, आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून बापाच्या उदार कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

| Updated on: Dec 11, 2025 | 2:37 PM
1 / 6
मुलगी म्हणजे तळहातावरचा फोड असतो. मुलगी म्हणजे डोळ्यातील अंजन असते. मुलगी म्हणजे हृदयात होणारी धडधड असते, जिच्याशिवाय जगता येत नाही. तिच्यात बाप नावाच्या माणसाचा जीव अडकलेला असतो. मग आपल्या लाडक्या लेकीसाठी हा बाप नावाचा माणूस काहीही करायला तयार होतो. अगदी जीवही द्यायला तयार होतो. कारण लेकीची माया कशातच तोलता येत नाही. जगातलं कोणतंही तराजू ही माया मोजू शकत नाही.

2 / 6
धाराशिवमध्ये एका बापाने आपल्या लाडक्या लेकीसाठी असंच काही तरी केलं. लेक मोठी झाली. तिचं शिक्षण झालं. अन् आता लग्न... मुलीचं लग्न धडाक्यात लावण्याचा जामानिमा केलाच. पण हळदही दणक्यात करण्याचा या बापाने निर्धार केला. हळदीच्या दिवशी त्यांनी असं काही केलं की अख्खं गाव पाहत राहिलं. बापाचं लेकीवरच अतुट प्रेम पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. सर्वच जण बापाच्या या उदारतेची चर्चा करत आहे. फक्त गावच नाही बरं, अख्खा धाराशिव जिल्हा या बापाच्या मायेची चर्चा करत आहे.

3 / 6
या बापाचं नाव आहे अशोक वेताळ. बापू वेताळ म्हणून ते धाराशिवमध्ये प्रसिद्ध आहेत. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सोनगिरी येथील ते रहिवासी आहेत. शेतकरी आणि उद्योजक म्हणून जिल्ह्यात त्यांचं नाव आहे. त्यांची एकुलती एक मुलगी ऋतुजा हिचा विवाह सोहळा आहे.

4 / 6
ऋतुजा वेताळ हिचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सापटणे येथील उद्योजक विठ्ठल माणिकराव ढवळे-पाटील यांच्या मुलाशी ठरला आहे. दोन दिवसावर म्हणजे 13 डिसेंबर रोजी हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

5 / 6
मात्र विवाह सोहळ्याच्या विधी कार्यक्रमाला नववधू ऋतुजाला वेताळ परिवाराने चक्क हेलिकॉप्टरमधून वाजत गाजत पाठवले.  लाडक्या लेकीला हळदी कार्यक्रमासाठी जायला वेताळ कुटुंबाने चक्क हेलिकॉप्टर आणले. हेलिकॉप्टरचा थाट करत थाटामाटात मुलीला सासरी पाठवले.

6 / 6
हेलिकॉप्टरमधून ऋतुजा हिची पाठवणी होत असताना अख्खं गाव जमलं होतं. पंचक्रोशीतील गावकरीही आले होते. हा थाटमाट पाहून आणि बापाची माया पाहून अनेकांना भरून आलं. सद्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असून वडिलांच्या या कृतीचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.