
बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक मल्टीस्टारर चित्रपट येऊन गेले. हे चित्रपट प्रेक्षकांना आवडले सुद्धा. फॅन्सना एकाचवेळी अनेक स्टार्स एकाचवेळी पडद्यावर पहायला आवडतं. त्याचा चित्रपटाला फायदा सुद्धा होतो. आता अजून एक मल्टीस्टारर सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी तयार आहे. डिसेंबरमध्ये हा धमाका होणार आहे.

नुकताच धुरंधर चित्रपटाचा चार मिनिटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटात रणवीर सिंहशिवाय संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर.माधवन आणि अक्षय खन्ना या कलाकारांनी आपल्या लूकने लक्ष वेधून घेतलं. कलाकारांसोबत आता त्यांची फि सुद्धा आली. लीड अभिनेता रणवीर सिंहने या चित्रपटासाठी 50 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे.

अर्जुन रामपाल सुद्धा ट्रेलरमध्ये बऱ्यापैकी दिसला. स्क्रीन टाइममध्ये प्रेक्षकांना अक्षय खन्नाचा सुद्धा जलवा पहायला मिळाला. छावामध्ये अक्षयने रंगवलेल्या औरंगजेबाच्या कॅरेक्टरची आठवण झाली. या दोन्ही चित्रपटांसाठी त्याने किती मानधन घेतलं? हे तुम्हाला माहितीय का?.

रिपोर्ट्सनुसार अर्जुन रामपालला या चित्रपटासाठी अशी फार खास रक्कम मिळालेली नाही. त्याला फि पोटी फक्त 1 कोटी दिलेत. त्या तुलनेत अक्षय खन्नाची फि थोडी जास्त आहे. रिपोर्ट्सनुसार धुरंधरसाठी अक्षय खन्नाला 3 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. पण ही रक्कम रणवीरला मिळालेल्या रक्कमेच्या तुलनेत काहीच नाही.

आर माधवनचा सुद्धा चित्रपटात महत्वाचा रोल आहे. त्याला या चित्रपटासाठी 3 कोटी रुपये ऑफर करण्यात आले आहेत. ट्रेलरमध्ये दमदार एन्ट्रीने सर्वांच लक्ष वेधून घेणाऱ्या संजय दत्तला या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये फि दिल्याची चर्चा आहे. लीड अभिनेत्री सारा अर्जुनचा डेब्यु चित्रपट आहे. तिला 1 कोटी रुपये देण्यात आले आहेत.