
विंचू पाहिला की अनेकजण घाबरतात. कारण विंचू एकदा चावला की त्याच्या विषामुळे खूप त्रास होते. अंगाची आग होते. त्यामुळेच विंचू चावल्यावर लवकरात लवकर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. याच विंचवाबद्दल अनेक समज गैरसमज आहेत.

विंचवाची पिलं जन्म झाला की लगेच आपल्या आईला खाऊन टाकतात, आईचीच शिकार करतात असा दावा नेहमी केला जातो. या दाव्यांमध्ये किती सत्यता आहे ते जाणून घेऊ या. आईच्या प्रेमाचे उदाहरण देताना मादा विंचू आपल्या मुलांना जेवण मिळावे म्हणून स्वत:च्या जीवनाचा त्याग करते, असा दावा केला जातो.

परंतु या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार ही फक्त एक वदंता आहे. मादी विंचू अंडे न देता थेट आपल्या मुलांना जन्म देते. या प्रक्रियेला स्कॉर्पलिंग म्हटले जाते. मादी विंचू एका वेळेला दहा ते 100 मुलांना जन्म देऊ शकते. विंचवाची मुलं जन्मल्यानंतर खूप नाजूक असतात. त्यांचा बाहेरचा भाग टणक झालेला नसतो.

विंचवाची पिलं स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आपल्या आईच्या पाठीवर जाऊन बसतात. आपल्या आईच्या पाठीवर ही पिलं साधारण दहा ते 20 दिवस राहतात. या काळात मादी विंचू आपल्या छोट्या पिलांचे रक्षण करते. त्यांची शिकार होऊ धेत नाही. एरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधील जुन्या जर्नलनुसार नवजात पिलांनी आपल्याच आईची शिकार करणे ही खूपच दुर्मिळ बाब आहे.

कोळी, स्युडोस्कॉर्पियन्समध्ये हा प्रकार दिसून येतो. विंचवाची पिलं आपल्या आईचीच शिकार करतात, यात तथ्य नाही. परंतु आपली जी मुलं अशक्त, कमकुवत असतात, अशा पिलांची शिकार मादी विंचू करते. अन्य सशक्त आणि बलशाली पिलांचे चांगले पोषण व्हावे म्हणून मादी विंचू कमजोर मुलांना खाऊन टाते.