AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather update : आणखी मुसळधार पाऊस होणार, राज्यासाठी ताजा हवामान अंदाज आला, तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा असणार?

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसह कोकण आणि पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तर विदर्भातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.

Weather update : आणखी मुसळधार पाऊस होणार, राज्यासाठी ताजा हवामान अंदाज आला, तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा असणार?
weather update todayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 05, 2026 | 9:03 PM
Share

Maharashtra Rain Update : सध्या राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, उपनगर, कोकण, पुणे ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे तर मुंबईची दाणादाण उडाली आहे. मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर कुठे पाणी साचलेले आहे. ठाणे, कल्याण, पनवेल, रायगडमध्येही तुफान पाऊस आहे. हीच बाब लक्षात घेता कल्याण डोंबिवली, ठाणे, रायगड, पालघर येथे शाळांनास सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या पावसामुळे सगळीकडे तारांबळ उडालेली असताना पुढच्या काही दिवसांचा ताजा हवामान अंदाज समोर आला आहे. पुढच्या दोन दिवसात आणखी तुफान पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पावसाचा जोर चांगलाच वाढणार

हवामान तज्ज्ञ, डॉ रामचंद्र साबळे यांनी 5 आणि 6 जुलै रोजी वातावरण कसे असेल, पावसाची स्थिती काय असेल, याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हवेचा दाब कमी होत असल्याने उद्या आणि परवा पावसाचं प्रमाण आणखी वाढणार आहे, कोकण किनारपट्टी, मुंबई या भागात शंभर ते दीडशे किंवा त्यापेक्षाही जास्त मिलिमीटर पाऊस पडणार आहे. पुण्यामध्येही 50 ते 60 मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाचा पाऊस

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसह कोकण आणि पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तर विदर्भातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. आगामी दिवसात मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. सध्या नैऋत्य मान्सून नुकतेच सक्रिय झाले आहेत. त्याचा फायदा मराठवाड्याला होईल, असेही डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे.

मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे

दरम्यान, पुढच्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईकरांनीही गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार