AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुसळधार पाऊस कहर करणार, मुंबईसह या 3 जिल्ह्यांमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांचा थेट आदेश

School Holiday : कोकणासह मुंबई उपनगरातील अनेक भागाला पावसाने झोडपून काढलेले आहे. अशातच आता 3 जिल्ह्यांमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुसळधार पाऊस कहर करणार, मुंबईसह या 3 जिल्ह्यांमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांचा थेट आदेश
School Holiday in Raigad Thane and Palghar DistrictImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 05, 2026 | 9:18 PM
Share

मुंबई आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकणासह उपनगरातील अनेक भागाला पावसाने झोडपून काढलेले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी अपघातही झाले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशातच आता 3 जिल्ह्यांमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबसविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ठाणे जिल्ह्यातील शाळांना 6 जुलै रोजी सुट्टी जाहीर

भारतीय हवामान विभागाने 6 जुलैसाठी ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सखल भाग, नदी व खाडीकिनारी पाणी साचण्याची शक्यता वाढली आहे. संभाव्य आपत्तीजन्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी 6 जुलै 2026 रोजी सुट्टी जाहीर केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, बालवाडी तसेच शासकीय व निमशासकीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद राहतील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर KDMC परिसरातही शाळांना सुट्टी

हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केडीएमसी हद्दीतील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा निर्णय महापालिकेच्या शिक्षण विभागाने अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालकांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

रायगड आणि पालघरमधील शाळांनाही उद्या सुट्टी

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार, 6 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबईतील सर्व शांळांना उद्या सुट्टी

भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या, दिनांक 6 जुलै 2026 रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. मात्र, शासकीय व खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असेदेखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उद्या नवी मुबंई पालिकेच्या सर्व शाळाना सुट्टी जाहीर

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांनी निर्गमित केलेल्या उपरोक्त आदेशाच्या अनुषंगाने तसेच आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिकायांच्या निर्देशानुसार, उद्या सोमवार, दिनांक 06 जुलै 2026 रोजी अतिवृष्टी विचारात घेऊन विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. सदर आदेशाची सर्व संबंधित शाळांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच विद्यार्थी, पालक व शिक्षकांना याबाबतची माहिती त्वरित कळविण्यात यावी असा आदेश पालिकेकडून जारी करण्यात आला आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे