
बॉलिवूडमधील सर्वांचे लाडके कपल अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून गूड न्यूज शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या घरी गोंडस मुलाचे आगमन झाल्याचे सांगितले.

सोशल मीडियावर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. त्यावर माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, मलायका अरोरा, करीना कपूर खान आणि इतर काही सेलिब्रिटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या होत्या. सध्या सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. त्यामध्ये अभिनेता सलमान खानने कमेंट केल्याचा दावा केला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये कतरिनाच्या पोस्टवर सलमान खानच्या अधिकृत अकाऊंटवरुन कमेंट केल्याचा दावा केला आहे. सलमान कमेंटमध्ये, "ये सब प्रायव्हेट चीजें इंटरनेट पे मत डाला करो यार" असे बोलत आहे.

ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. त्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली की भाईजानने खरंच कतरिनाच्या पोस्टवर कमेंट केली आहे का? पण जेव्हा नीट पाहिले तेव्हा कन्फर्म झाले की स्क्रीनशॉटमध्ये छेडछाड करण्यात आली आहे.

सलमान खानने कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या पोस्टवर कोणतीही कमेंट केलेली नाही हे स्पष्ट होत आहे. व्हायरल होणारा स्क्रीनशॉट हा फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे.