थेट भजन सम्राटानेच गायले गाणे, प्रदर्शित होताच ठरले सुपरहिट, आजही ऐकताच डोळ्यात येते पाणी
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या गाण्याच्या फिल्मला १३ नामांकने मिळाली, त्यापैकी केवळ ३ पुरस्कार मिळाले होते. त्यावेळी हे गाणे सुपरहिट ठरले होते.

हिंदी सिनेमात अनेक रोमँटिक चित्रपट आले जे पाहून प्रेक्षकांना आनंदा झाला. पण १९८१ मध्ये एक अशी फिल्म आली ज्याने प्रेक्षकांची झोप उडवली. तसेच या फिल्ममधील गाणी देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सध्या एका गाण्याची चर्चा सुरु आहे. हे गाणे भजन गाणाऱ्या गायकाने गायले होते. आता तुम्ही विचार करत असाल हे गाणे नेमके कोणते आहे?

आम्ही ‘एक दूजे के लिए’ या फिल्मविषयी बोलत आहोत. या चित्रपटात कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या सपना आणि वासूची भूमिका विशेष चर्चेत होती. फिल्मची कहाणी आणि विशेषतः तिचा शोकांतिक शेवट प्रेक्षकांच्या मनावर खोलवर उतरला.

फिल्म ‘एक दूजे के लिए’ने आपल्या भावनिक कहाणीसोबत त्यातील गाण्यांनीही प्रेक्षकांना खूप रडवले. या फिल्ममध्ये एकूण ६ गाणी होती. संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते. सर्व गाण्यांचे बोल महान गीतकार आनंद बक्शी यांनी लिहिले होते.

या फिल्ममधील ‘तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना’, ‘मेरे जीवन साथी प्यार किए जा’, ‘हम तुम दोनों जब मिल जाएंगे’, ‘हम बने तुम बने एक दूजे के लिए’ आणि ‘सोळा बरस की बाली उमर को सलाम’ ही गाणी अतिशय लोकप्रिय झाली. ‘तेरे मेरे बीच में...’ या गाण्यासाठी आनंद बक्शी यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.

‘सोळा बरस की बाली उमर को सलाम’ हे गाणे त्या काळात प्रचंड गाजले. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे, त्यात लता मंगेशकर यांच्यासोबत भजन सम्राट अनूप जलोटा यांनी गायले होते. गाण्याची लोकप्रियता इतकी होती की, आजही सोशल मीडियावर या गाण्याच्या अंतरांवर रील्स बनवल्या जातात.