या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी थेट कनेक्शन

Dilip Buildcon Share: या कंपनीच्या शेअरमध्ये सध्या मोठी घडामोड घडत आहे. आज शुक्रवारी 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्यामागे या कंपनीला अदानी समूहाकडून मिळालेला कार्यादेश आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे

| Updated on: Dec 26, 2025 | 5:18 PM
1 / 6
दिलीप बिडकॉनच्या शेअरमध्ये सध्या तुफान आले आहे. शुक्रवारी या शेअरमध्ये 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. या कंपनीला  अदानी समूहाने दोन मोठ्या ऑर्डर दिल्या आहेत. कंपनीला अदानी समूहाकडून काम मिळत असल्याने बाजारात या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. ही कंपनी रस्ते बांधणीसंदर्भात आणि ऊर्जा क्षेत्रात काम करणार आहे.

2 / 6
बीएसईवर आज दिलीप बिडकॉनचा शेअर 456.35 रुपयांवर उघडला. दिवसभरात कंपनीच्या शेअरचा भाव बीएसईवर 5 टक्क्यांच्या तेजीसह 490.70 रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहचला. त्यामुळे गुंतवणूकदारांना आज फायदा झाला. त्यांनी झटक्यात पैसा कमावला. ज्यांनी गुंतवणूक केली. त्यांना जणू लॉटरीच लागली.

3 / 6
दिलीप बिडकॉन ही भोपाळमधील कंपनी आहे. या कंपनीला अदानी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेडकडून कार्यादेश मिळाला आहे. सुलातनगंज-भागलपूर जोडणाऱ्या गंगा रोडचे निर्माण करणार आहे. या प्रोजेक्टसाठी एकूण 3400 कोटी रुपये खर्च होणार आहे. या कामासाठी एकूण 42 महिन्याचा कालावधी लागणार आहे.

4 / 6
याशिवाय या कंपनीला आरईसी पॉवर डेव्हलपमेंट लिमिटेडकडून अजून एक वर्क ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला कर्नाटकमधील बेलगावी येथे 400 किलोवॅटच्या सबस्टेशनचे काम करावे लागणार आहे. या वर्कऑर्डरची किंमत 1850 रुपये इतकी आहे. दिलीप बिडकॉनला हे काम 24 महिन्यात पूर्ण करावे लागणार आहे.

5 / 6
गेल्या एका वर्षात कंपनीसाठी शेअर बाजारात अच्छे दिन होते. 6 महिन्यात दिलीप बिल्डकॉमचा शेअर 34 टक्क्यांनी घसरला. तर एका वर्षात शेअर्सच्या किंमतीत 15 टक्क्यांची तेजी दिसली. दोन वर्षांचा विचार करता या शेअरमध्ये 84 टक्क्यांची वाढ झाली आहे.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.