
आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. तो चार्ज करण्यासाठी चार्जरचीही गरज असते. बाजारात सहसा काळा किंवा पांढरा रंगाचा चार्जर मिळतो, पण बहुतेक कंपन्या फोनसोबत पांढरा चार्जर देतात.

रोजच्या वापरामुळे पांढऱ्या रंगाचा चार्जर लवकर घाणेरडा आणि काळा होतो. तुम्ही तुमचा चार्जर कितीही चांगला ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी हळूहळू त्यावर घाण साचते. त्यामुळे त्याचा रंग काळपट दिसू लागतो.

जर तुम्हाला काळपट पडलेला चार्जर पुन्हा नव्यासारखा पांढरा आणि चमकदार बनवायचा असेल तर काही सोप्या युक्त्या करु शकता. यामुळे तुमचा चार्जर पुन्हा नवीन दिसेल.

तुमचा चार्जर स्वच्छ करण्यासाठी २ चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यात दोन थेंब लिंबाचा रस आणि थोडे पाणी घालून एक पेस्ट तयार करा. हे मिश्रण एका स्पंजवर घेऊन तुमचा चार्जर नीट पुसून घ्या.

यामुळे चार्जरवर लागलेली सर्व घाण स्पंजला चिकटून राहील. त्यानंतर तुमचा चार्जर पूर्वीसारखा स्वच्छ दिसेल. हे मिश्रण वापरून साफ केल्यानंतर एका ओल्या कापडाने चार्जर पूर्णपणे स्वच्छ पुसून घ्या.

जर तुम्हाला तुमचा काळपट किंवा घाणेरडा चार्जर पुन्हा पांढरा करायचा असेल, तर एक लिंबू घ्या. त्याचा संपूर्ण रस काढून घ्या आणि मग त्याची साल तुमच्या चार्जरवर घासून घ्या. यामुळे चार्जरमधील घाण सहज निघून जाईल.

पांढरा चार्जर चमकवण्यासाठी एका भांड्यात २ चमचे व्हिनेगर घ्या. या व्हिनेगरमध्ये एक कापड बुडवा आणि त्या कापडाने चार्जर हलक्या हाताने पुसून टाका. यानंतर तो ओल्या कापडाने पुन्हा पुसून घ्या.