
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर लोकसभा मतदारसंघामधील नागरिकांना श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे आयोजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्धाटन जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी भाजपवर सडकून टीका केली. ईडी भाजपला संपविल्याशिवाय राहणार नाही असे मुंडे म्हणाले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पवार चॅरीटेबल ट्रस्ट, अपंग हक्क विकास मंच, ठाकरसी ग्रुप, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र महात्मा गांधी सेवा संघ आणि जगदंब प्रतिष्ठान यांच्या वतीने हे शिबिराचे आयोजन करण्यात आले.

हे शिबीर 9 ते 12 डिसेंबरपर्यंत घेण्यात येणार आहे. भोसरी आंबेगाव, खेड, शिरूर, जुन्नर आणि हडपसर विधानसभा मतदार संघातील लाभार्थ्यांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी वेगवेगळ्या खेडेगावांतून येत आहेत.