
बीएपीएस स्टुटगार्ट मंडळाच्यावतीने जर्मनीतील स्टुटगार्ड येथे अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी पॅरिसच्या बीएपीएस हिंदू मंदिराच्या‘अन्नकूट - 2025’ थीमवर आधारित सोहळा झाला

स्टुटगार्टमध्ये भव्य आणि सुंदर अन्नकूट तयार करण्यात आले होते. या सोहळ्याला पू. मनोहरमूर्ती स्वामी आणि पू. निर्गुणपुरुष स्वामी (लंडन मंदिर) यांचे शुभ आगमन येथे झाले.

या दिवाळी आयोजनात देवासाठी ३२५ पेक्षा अधिक पदार्थ अर्पण करण्यात आले. ३७५ हून अधिक भारतीय मंडळी (पुरुष, महिला व बालकांसह) यांनी उपस्थिती लावली.

मुलांसाठी सर्जनशील आणि मनोवेधक बाल-बालिका सभा भरवण्यात आल्या आणि त्यात अनेक भारतीय मंडळींच्या मुलांनी सक्रीय सहभाग घेत आपल्या हिंदू संस्कृतीचा जागर केला.

जर्मनीतील स्टुटगार्ट येथील या दिवाळी सोहळ्यासाठी सर्व विभागांतील स्वयंसेवकांनी दाखवलेली खरी भक्ती, एकता आणि उत्कृष्ट समन्वय यामुळे हा सोहळा रंगतदार आणि भक्तीभावाने परिपूर्ण असा झाला.