
आचार्य चाणक्य यांनी जगणं सोपं आणि यशस्वी कसं असावं याबद्दल सांगितलं आहे. त्यांनी दिलेल्या नीतीशास्त्रानुसार चालल्यास आयुष्यातील अनेक संकटं नाहीशी होऊ शकतात. आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात काही जागांवर कधीच थांबू नये असे सांगितलेले आहे. या जागा कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या..

चाणक्य नीतीनुसार ज्या ठिकाणी तुम्हाला रोजगार मिळण्याची शक्यता नाही, ज्या ठिकाणी लोकांना भीती नाही, लज्जा नाही, उदारता नाही अशा ठिकाणी कधीच थांबू नये. अशा ठिकाणी कधीच निवासस्थान बांधू नये. नाहीतरी आयुष्यभर घरात नकारात्मक उर्जा राहते.

ज्या ठिकाणी श्रीमंत लोक नसतील, विद्वान लोक नसतील, उपचार करण्यासाठी वैद्य नसतील त्या ठिकाणीही कधीच घर बांधू नये. अशा ठिकाणी कधी थांबूही नये. येथे वास्तव्य केल्यास तुमचे आयुष्य, जीवन अंधकारमय होऊ शकते, असे चाणक्य नीतीत सांगितलेले आहे.

माझी कमाई किती आहे, मी घर बांधतो आहे, तो परिसर करसा आहे, माझे मित्र कसे आहे, सध्याची माझी वेळ कशी आहे, या सर्व गोष्टींचा विचार करूनच घर बांधावे. या सर्व बाबींचे मूल्यांकन करूनच घर बांधण्याचा निर्णय घ्यावा, असे चाणक्य नीती सांगते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.