AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : पुन्हा तळपणार ‘हिटमॅन’ची बॅट ? रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, लवकरच…

इंग्लंडविरुद्धच्या शतकानंतरही रोहित शर्माच्या वनडे भविष्यावर प्रश्नचिन्ह होते, पण आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तो परतू शकतो, जिथे त्याची कामगिरी २०२७ च्या वर्ल्ड कपमधील स्थानासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. निवड समितीने त्याला आणखी एक संधी दिल्याचे बोलले जात आहे.

Rohit Sharma : पुन्हा तळपणार  ‘हिटमॅन’ची बॅट ? रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, लवकरच...
पुन्हा तळपणार रोहित शर्माची बॅट ?
| Updated on: Aug 15, 2026 | 1:27 PM
Share

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात शानदार शतक झळकावत रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या टीकाकारांना दमदार उत्तर दिलं. मात्र, या जबरदस्त खेळीनंतरही त्याच्या वनडे कारकिर्दीबाबतचे तर्कवितर्क, चर्चा थांबलेली नाही. विशेषतः 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित हा भारतीय संघाचा भाग असेल की नाही, यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. तो पुन्हा खेळताना दिसणार काी नाही, याची चिंता क्रिकेटप्रेमींना सतावत आहे. मात्र याचदरम्यान, रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. पुढील महिन्यात, म्हणजेच सप्टेंबरमध्ये, रोहित पुन्हा एकदा मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो. त्यामुळे पुन्हा त्याची बॅट तळपण्याची शक्यता असून क्रिकेट चाहत्यांना अद्भुत खेळ पहायला मिळू शकतो.

रोहितला मिळणार आणखी संधी?

रोहितच्या भवितव्यावर बीसीसीआय आणि निवड समितीमध्ये चर्चा सुरू असल्याचे बोललं जात होतं. आता मात्र त्याला तातडीने संघाबाहेर करण्याऐवजी आणखी संधी देण्याच्या दिशेने निर्णय झाल्याचं मानलं जात आहे. त्यानुसार, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत रोहितला आपली क्षमता पुन्हा सिद्ध करण्याची संधी मिळेल. आगामी 2027 वर्ल्ड कपचा विचार करता, या मालिकेतील त्याची कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे रोहितचा अनुभव आणि आक्रमक फलंदाजी पुन्हा एकदा भारतीय संघासाठी निर्णायक ठरू शकते.

रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम?

इंग्लंड दौऱ्यादरम्यान रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, अशा चर्चांना उधाण आलं होतं. युवा फलंदाजांना संधी देण्यासाठी रोहितला बाजूला केलं जाऊ शकतं, अशीही बरीच चर्चा सुरू होती. लॉर्ड्समधील सामना त्याचा अखेरचा वनडे ठरू शकतो, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. मात्र,त्यावर स्पष्ट काहीही भाष्य न करता, रोहितने आपल्या बॅटनेच या सर्व चर्चांना उत्तर दिले. आपण अजूनही मोठ्या सामन्यांमध्ये प्रभाव पाडू शकतो, हे त्याने लॉर्ड्समध्ये शतक ठोकत दाखवून दिलं.

आता प्रत्येक मालिकेत होणार कामगिरीचं मूल्यमापन

रोहितच्या भवितव्याबाबत बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचेही सांगितलं जात आहे. त्यानंतर त्याला आणखी काही संधी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पुढील काळात मालिकेनुसार त्याच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा अर्थ असा की, वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका रोहितसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

आगरकर यांच्या भवितव्यावरही निर्णय?

दरम्यान, मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांच्या भवितव्याबाबतही चर्चा सुरू आहे. भारतीय संघाने अलीकडील मोठ्या आयसीसी स्पर्धांमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर आगरकर यांचा कार्यकाळ 2027 वर्ल्ड कपपर्यंत वाढवला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, श्रीलंका कसोटी मालिकेनंतर बीसीसीआयची महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात आगरकर यांच्या पुढील कार्यकाळाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. रोहित शर्माच्या भवितव्याबाबत निवड समिती आणि बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचंही वृत्त समोर आलं होतं. निवड समिती संघात बदल करण्याच्या विचारात असताना बोर्डाचे सचिव देवजीत सैकिया यांनी रोहित संघाच्या योजनांमध्ये असेपर्यंत तो खेळत राहील, अशी भूमिका मांडली होती असं बोललं जात आहे.

Follow Us
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश