AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs BAN: ऑस्ट्रेलिया पराभवाच्या सावटाखाली, कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशची सरशी

ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्यावर बांगलादेशने पकड मिळवली. चौथ्या दिवशी हा सामना निर्णायक स्थिती येण्याची शक्यता वाढली आहे.

AUS vs BAN: ऑस्ट्रेलिया पराभवाच्या सावटाखाली, कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशची सरशी
AUS vs BAN: ऑस्ट्रेलिया पराभवाच्या सावटाखाली, कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशची सरशीImage Credit source: Bangladesh national cricket team players celebrating an on-field dismissal during a Test cricket match.
| Updated on: Aug 15, 2026 | 1:43 PM
Share

ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून तीन दिवसांचा खेळ संपला आहे. तीन दिवसांचा खेळ संपला असून तिसऱ्या दिवसावरही बांगलादेशने अधिराज्य गाजवलं. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर असून चौथा दिवस निर्णायक ठरणार आहे. बांग्लादेश कसोटी सामना जिंकेल अशी स्थिती आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची उत्सुकता वाढली आहे. चौथ्या दिवशी काय होणार याकडे नजरा खिळल्या आहेत. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ 198 धावांवर सर्वबाद झाला होता. दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने 1 गडी गमवून 96 धावा केल्या. तसेच दुसऱ्या दिवशी बांगलादेशी खेळाडूंनी गाजवला आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या डावात 6 गडी गमावून 351 धावा केल्या. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात फलंदाजी करताना 75 धावांची भर घालत 426 धावा केल्या. यासह पहिल्या डावात 228 धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमवून 161 धावा केल्या आणि 67 धावांनी पिछाडीवर आहेत. कॅमरून ग्रीन नाबाद 43 आणि एलेक्स कॅरे नाबाद 19 धावांवर खेळत आहेत.

पहिल्या डावात बांगलादेशने 228 धावांची घेतलेली आघाडी मोडून काढण्याचं आव्हान ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर आहे. त्यामुळे या धावा केल्यानंतर बांगलादेशपुढे विजयी आव्हान देता येईल. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना झुंजार खेळीशिवाय पर्याय नाही. पण या धावांची आघाडी मोडून काढताना आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. जेक वेदराल्डला तर खातंही खोलता आलं नाही. ट्रेव्हिस हेड 17 धावा करून बाद झाला. मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मार्नस लाबुशेन 31, तर स्टीव्ह स्मिथ 44 धावा करून बाद झाला.

दुसऱ्या डावात हसन महमूदची गोलंदाजी प्रभावी ठरली. त्याने 2 विकेट काढल्या. तर तैजुल इस्लाम आणि मेहिदी हसन मिराजने प्रत्येकी एक विकेट घेतली. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना झटपट बाद करण्यात बांगलादेशी गोलंदाजांना यश आलं तर या सामन्यावर बांग्लादेश पकड मिळवेल. त्यामुळे चौथ्या दिवसांचं महत्त्व वाढलं आहे. तिसऱ्या दिवसापर्यंत तरी बांगलादेशने पकड मिळवली आहे.

बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवल्यास क्रिकेट विश्वात अनेक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित होईल. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात कसोटीत हरवण्याची बांगलादेशची ही इतिहासातील पहिलीच वेळ असेल. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा केवळ दुसरा विजय ठरेल. यापूर्वी 2017 मध्ये ढाक्यात ऑस्ट्रेलियाला 20 धावांनी नमवलं होतं.

Follow Us
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल